Donnerstag, 26. April 2018

Mukta Puntambekar, Direktor, Muktangan

Eine Gelegenheit, Mukta Puntambekar, Direktor, Muktangan, im Programm Parisparsh, eine Initiative von Snehalaya, die eine Reihe von Interviews von bedeutenden Persönlichkeiten ist, die eine revolutionäre Veränderung in der Gesellschaft herbeigeführt haben, zu treffen. Muktangan ist eine Organisation, die seit 32 Jahren für die Rehabilitation von Suchterkrankungen arbeitet. Muktangan wurde von Muktas Eltern Dr. Anil & Dr. Sunanda Avchat gegründet. Bis heute hat Muktanhan mehr als 35000 Opfern verschiedener Arten von Süchten geholfen. Mukta wird über ihre Organisation und die Werte, die ihre Eltern in ihrer Schwester Yashoda eingeschärft haben, sprechen. Das Programm ist kostenlos und offen für alle. Für Eintrittskarten wenden Sie sich bitte an 9011026482.

' परिसस्पर्श ' कार्यक्रमातून रविवारी मुक्ता पुणतांबेकर उलगडणार मुक्तांगण आणि कौटुंबिक नात्यांचा प्रवास
अहमदनगर,२६ एप्रिल २०१८:
' परिसस्पर्श ' या प्रगट मुलाखतींच्या मालिकेतील तिसरे पुष्प गुंफण्यासाठी येत्या रविवारी, दि.२९ एप्रिल २०१८ रोजी पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर येथे येत आहेत. सायंकाळी ७ वाजता केडगाव येथील स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या, सौ. रुपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुल येथे, ‘मुक्तांगण’ आणि कौटुंबिक नात्यांचा प्रवास सौ.मुक्ता उलगडणार आहेत.
प्रख्यात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल आणि डॉ. सुनंदा अवचट यांच्याकडून मिळालेले संस्कारधन, बालपण ते मुक्तांगणचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळण्यापर्यंतचा हा प्रवास श्रोत्यांसाठी मनोवेधक आणि चिंतनीय आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आणि खुला असून, त्याच्या प्रवेशिकांसाठी ९०११०२६४८२ या क्रमांकावर संपर्काचे आवाहन स्नेहालय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
व्यसनमुक्तीचे आव्हान
२९ ऑगस्ट १९८६ रोजी अवचट दाम्पत्याच्या पुढाकाराने स्थापन झालेली ' मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ' ही संस्था भारतात व्यसनमुक्तीचे पथदर्शी कार्य करीत आहे. गेल्या ३२ वर्षात ३५ हजारांवर रुग्णांना मुक्तांगणने व्यसनमुक्त केलं.
तथापि व्यसनाधीनतेचे भारतातील वाढते प्रमाण अस्वस्थ करणारे आहे. रोज नव्याने ५ हजारांवर मुले-मुली व्यसनाधीन होतात. भारतातील सर्व महानगरांची अवस्था तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने चिंताजनक बनते आहे. पंजाबसारख्या काही राज्यात तर व्यसनाधीन झालेली ७५% लोकसंख्या समाजासमोर गंभीर आव्हान बनली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वर्ष २००४ च्या अहवालानुसार भारतातील ७३२ लाख लोक तेव्हाच व्यसनाधीन झालेले होते.
काही व्यक्ति आणि प्रयत्नवादी संस्था या प्रश्नांना थेट भिडल्या. मुक्ता पुणतांबेकर यांची आई, डॉ.सुनंदा अवचट ही त्या पैकीच एक. पेशाने डॉक्टर आणि हृदयाने कार्यकर्त्या असणाऱ्या डॉ. सुनंदा यांनी ‘मुक्तांगणची ' स्थापना केली. त्यांचे पती प्रसिद्ध लेखक अनिल अवचट या अवघड वाटेवर त्यांचे सहप्रवासी होते.
सुनंदा येरवडा हॉस्पिटलमध्ये मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. व्यसनांमुळे वेडे झालेले लोक त्यांच्या रोजच्याच पाहण्यातले होते. या वेड्यांच्या व्यसनमुक्तीसाठी काही भरीव प्रयत्न करण्याच्या अंतरिक इच्छेने ' मुक्तांगणला ' जन्म दिला. पु.ल.देशपांडे यांच्यासारख्या विचक्षण माणसाचे बळ मुक्तांगणमागे कायम उभे राहिले. दहा हत्तीचे बळ आणि शेकडो माणसांची उर्जा मागणारे हे काम होतं. सुनंदा आणि अनिल अवचट हे काम उभारताना जगावेगळ, शहाण सहजीवन जगले. घरची जवाबदारी, बालसंगोपन अनिल यांनी केलं. सुनंदाला तिच्या ध्येयासाठी दशदिशा मोकळ्या करून दिल्या. मुक्ता आणि यशोदा या अनिल अवचट आणि सुनंदा यांच्या मुली अपापल्या क्षेत्रात नावारूपाला आल्या. आई वडिलांप्रमाणेच हृदयाने कार्यकर्त्या राहिल्या.
मुक्तांगणचे शिवधनुष्य
' मुक्ता पुणतांबेकर’ ही मुक्तांगणची दिशाधार. आईच्या अकाली निधनानंतर तिने मुक्तांगणची धुरा सांभाळली. मुक्ताने प्रत्येक क्षेत्रात आईच्या पाउली पाय ठेवले. मुक्ता बारावीत बोर्डात तिसरी आली. एम.ए ला मानसशास्त्र या विषयात विद्यापीठात सर्व विषयात प्रथम येऊन तिने मानाचे 'चान्सलर गोल्ड मेडल ' पटकावले.
गेली अनेक वर्ष मुक्ता अथकपणे व्यसनमुक्तीसाठी काम करते. मुक्तांगण ही संस्था नसून कुटुंब आहे हा तिचा मनोभाव आहे. व्यसनमुक्तीचे काम प्रभावीपणे व्हावे यासाठी तिने अनेक शास्त्रशुद्ध पध्दती वापरल्या. नवीन व्यवस्थापन तंत्र वापरली. मुक्तांगणला ISO 2001 : 2008 मानांकन मिळाले. अशा प्रकारचे मानांकन मिळालेली मुक्तांगण ही भारतातील एकमेव व्यसनमुक्तीची संस्था आहे.
‘परीस्पर्श’ हा उपक्रम वेगळ्या वाटेने चालून यशोगाथा निर्माण करणाऱ्यांशी थेट संवादाची संधी नगरकरांना देतो.
An opportunity to meet ,Mukta Puntambekar, Director, Muktangan,in the program, Parisparsh, an initiative of Snehalaya which is a series of interviews of eminent personalities who have brought about a revolutionary change in the society. Muktangan is an organisation working for the rehabilitation of victims of addiction since last 32 years. Muktangan was founded by Mukta's parents, Dr Anil & Dr Sunanda Avchat. Till date Muktangan has helped more than 35000 victims of various types of addictions. Mukta will talk about her organisation and the values which her parents have inculcated in her sister Yashoda & herself. The program is free & open to all. For entry passes please contact 9011026482.

Keine Kommentare:

Kommentar veröffentlichen